मुंबई : शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी संदर्भात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आधी ३ ऑक्टोंबर सुनावणी होणार होती. परंतु ती ६ ऑक्टोंबरला ठेवण्यात आली. परंतु आता पुन्हा ती सुनावणी पुढे ढकलली असून ९ ऑक्टोबर रोजीची तारिख देण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच सुप्रिम कोर्टातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी होणार होती, परंतु ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
हेही वाचा…फडणवीसांचा रोहित पाटलांना थेट फोन, फडणवीसांनी दिलं आश्वासन, म्हणाले, “एक महिन्याच्या आत.., “
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या सुनावणीसंदर्भात वेळापत्रकाच्या विरोधात याचिकेवर आता ९ ऑक्टोंबर रोजी सुनावणी होणार आहे. मागच्या वेळी विधानसभा अध्यक्षांना निश्चित वेळापत्रक सादर करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. यातच आता विधानसभा अध्यक्षांनी पुढची तारिख १३ ऑक्टोबर ठेवली आहे आणि साधारणपणे डिसेंबर पर्यंत अंतिम युक्तिवाद सुरू होईल असे वेळापत्रक आहे. विधानसभा अध्यक्षांनी तयार केलेल्या वेळापत्रकाला सुप्रिम कोर्ट मान्यता देणार का ? याच उत्तर आता पुढच्या सुनावणीत मिळणार आहे.
हेही वाचा…४-१-१ महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरला, मुंबईतील लोकसभेच्या ‘या’ मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी लांबणीवर
महाविकास आघाडीने दाखल केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार होती. परंतु ती देखील आता पुढे ढकलण्यात आली असून तब्बल २ महिन्यांनी सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे आता यावर २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. २२ ऑगस्टपासून ही सुनावणी कारणाविना लांबणीवर जात आहे. यामुळे मुंबई, पुण्यासह अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या याचिका खोळंबल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी आता २०२४ उजाण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुटीचं प्रकरण आता निवडणुक आयोगात गेलं आहे. राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षनावाबाबत दाखल केलेल्या याचिकांवर येत्या ६ ऑक्टोंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याआधी ५ ऑक्टोंबरला शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची विस्तारीत कार्य समितीची दिल्लीत बैठक होणार आहे. निवडणूक आयोगातल्या लढाईसाठी या विस्तारित कार्य समितीमध्ये काही महत्त्वाची रणनीती ठरणार का ? कोण कोण उपस्थित राहणार याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांची नाराजी, भाजपचा अजित दादांना पाठिंबा, पण शिंदेंची आडकाठी, दिल्लीत काय झालं ?
हेही वाचा…फ्लेक्सबाजी करून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी पुनीत बालन यांना दणका, तातडीने ३ कोटी २० लाख भरण्याचे आदेश
हेही वाचा…“एक नाराज इंजिन फडणवीसांना जाऊन भेटलंय”,नाराजीच्या चर्चांवर सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…अजित पवार नाराज आहेत का ? शिंदे-फडणवीस तात्काळ दिल्लीला रवाना
हेही वाचा…“दोन्ही पक्षांना समजून घेऊ, भाजपला त्याग करावा लागेल”, फडणवीसांचा भाजपच्या कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश