सांगली : पाण्यापासून वंचित असलेल्या १९ गावांसाठी पाणी मिळावं, यासाठी स्व.आर आर पाटील यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. तासगाव आणि कवठेमहाकाळ तालुक्यातील १७ गावांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे आणि टेंभू योजनेत या गावांना समाविष्ठ केले पाहिजे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून प्रश्न मिटवण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…घाटी रूग्णालयात मृ’त्यू’चं थैमान..! खासदार हेमंत पाटलांनी रूग्णालयाच्या डीनलाच लावलं टॉयलेट साफ करायला
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी मतदारसंघातील १८ गावांच्या मंजूर झालेल्या पाण्यासाठी उपोषण करीत आहेत. या मागणीसाठी दोन दिवस उपोषणाला झाले आहेत. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पाटलांना फोनवरून संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडवण्यासंदर्भात रोहित पाटलांना विनंती केली. तसेच सुधारीत मान्यता एक महिन्याच्या आत देतो असं फोन करून पाटील यांना आश्वाशन दिले आहे. असं रोहित पाटलांच्या निकटवर्तीयांनी सांगितलंय.
हेही वाचा…102 फॅरनहेट ताप, उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांची तब्येत बिघडली,उपोषणावर ठाम
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांना आपल्याच मतदारसंघातील १८ गावांच्या मंजूर झालेल्या पाण्यासाठी उपोषण करायला लागते आहे, ही बाब खरतर दुर्दैवी आहे. स्व. आर. आर. आबा यांनी मोठ्या प्रयत्नांनी येथे सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री असताना ११९ गावांना ८ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कृष्णा पाणी वाटप लवादाच्या अधीन राहून या सर्व गावांसाठी पाणी योजना सुरू होणे अपेक्षित होतं. या टप्प्यात अंतर्भाव केलेल्या सर्व गावांच्या सुधारित मान्यतेच्या प्रस्ताव हा सरकारच्या दिरंगाईमुळे मान्य झालेला नाही. असं जयंत पाटलांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…४-१-१ महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरला, मुंबईतील लोकसभेच्या ‘या’ मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही
हेही वाचा…“सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत, पण औषधं घ्यायला पैसे नाहीत”, सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…रोहित पाटलांच्या उपोषणाला राष्ट्रवादीची साथ, जयंत पाटलांनीही केली फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…गोपीनाथ मुंडेंचे मावळे धावले पंकजा मुंडेंच्या मदतीला, तब्बल ‘इतक्या’ लाखांची केली मदत
हेही वाचा…“शासकीय रुग्णालय मृ’त्यू’चा सापळा, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी”