नांदेड : नांदेड येथील शासकीय रूग्णालयात मागील २४ तासात २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात देखील १० रूग्णांचा मृत्यू झाल्याने संपुर्ण राज्यातून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच नांदेड येथील रूग्णालयात जाऊन खासदार हेमंत पाटलांनी टॉयलेट साफ करायला लावले आहे. यातच आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय मंत्री हसन मुक्षीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा…102 फॅरनहेट ताप, उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांची तब्येत बिघडली,उपोषणावर ठाम
सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत. पण गोरगरिब आणि सामान्य लोकांच्या औषधांसाठी पैसे नाहीत. हे सरकार अंधाधुंदपणे काम करत आहे. नांदेड आणि संभाजीनगरमध्ये झालेली घटना भयंकर आहे. सध्या २१ व्या शतकात औषधं कशी कमी पडतात. असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेड, संभाजीनगरमधील घटनेवरून राज्य सरकारवर चढवला.
हेही वाचा…रोहित पवार काढणार ८२० किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा, कधी, कुठे आणि कोण कोण असणार? वाचा सविस्तर
आरोग्याशी संबंधित यंत्रणेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरु असताना राज्यकर्ते हात बांधून स्वस्थ बसले आहेत .संवेदनशील राज्यकर्त्यांनी आतापर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. नांदेड, ठाणे येथील रुग्णांच्या मृत्युंचे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एकाच दिवशी दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर नांदेडच्या त्याच रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्या आता २४ वरुन ३१ झाली आहे. हे सर्वजण सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणाचे बळी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेमध्ये अनागोंदी कारभार दिसत असूनही यावर उपाययोजना करण्याची शासनाची मानसिकता दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा देऊन आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली, या रुग्णांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. असं देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पाटलांच्या उपोषणाला राष्ट्रवादीची साथ, जयंत पाटलांनीही केली फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…गोपीनाथ मुंडेंचे मावळे धावले पंकजा मुंडेंच्या मदतीला, तब्बल ‘इतक्या’ लाखांची केली मदत
हेही वाचा…“शासकीय रुग्णालय मृ’त्यू’चा सापळा, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी”
हेही वाचा…घाटी रूग्णालयात मृ’त्यू’चं थैमान..! खासदार हेमंत पाटलांनी रूग्णालयाच्या डीनलाच लावलं टॉयलेट साफ करायला
हेही वाचा…“तानाजी सावंत अन् हसन मुश्रीफांचा राजीनामा घ्या,” ‘त्या’ घटनेवरून विजय वडेट्टीवारांची शिंदेंकडे मागणी