सांगली : पाण्यापासून वंचित १९ गावांसाठी पाणी मिळावं, यासाठी स्व.आर आर पाटील यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. तासगाव आणि कवठेमहाकाळ तालुक्यातील १७ गावांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे आणि टेंभू योजनते या गावांना समाविष्ठ केले पाहिजे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांची तब्येत बिघडली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन आपला पाठिंबा दिला.
हेही वाचा…रोहित पवार काढणार ८२० किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा, कधी, कुठे आणि कोण कोण असणार? वाचा सविस्तर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांना आपल्याच मतदारसंघातील १८ गावांच्या मंजूर झालेल्या पाण्यासाठी उपोषण करायला लागते आहे, ही बाब खरतर दुर्दैवी आहे. स्व. आर. आर. आबा यांनी मोठ्या प्रयत्नांनी येथे सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री असताना ११९ गावांना ८ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कृष्णा पाणी वाटप लवादाच्या अधीन राहून या सर्व गावांसाठी पाणी योजना सुरू होणे अपेक्षित होतं. या टप्प्यात अंतर्भाव केलेल्या सर्व गावांच्या सुधारित मान्यतेच्या प्रस्ताव हा सरकारच्या दिरंगाईमुळे मान्य झालेला नाही. असं जयंत पाटलांनी सांगितले आहे.
हेही वाचा…शिंदेंची ताकद वाढली, आतापर्यंत ठाकरेंचे ३५ नगरसेवक फोडले, काॅंग्रेसच्या महिला नेत्यालाही लावलं गळाला
दरम्यान, सुमनताई यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. शेवटी त्यांना उपोषणास बसावे लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची आग्रहाची मागणी आहे की, त्यांनी यावर तातडीने कार्यवाही करावी आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा असा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. यावेळी आमदार अरुण लाड, रोहित आर. आर. पाटील उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…गोपीनाथ मुंडेंचे मावळे धावले पंकजा मुंडेंच्या मदतीला, तब्बल ‘इतक्या’ लाखांची केली मदत
हेही वाचा…“शासकीय रुग्णालय मृ’त्यू’चा सापळा, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी”
हेही वाचा…घाटी रूग्णालयात मृ’त्यू’चं थैमान..! खासदार हेमंत पाटलांनी रूग्णालयाच्या डीनलाच लावलं टॉयलेट साफ करायला
हेही वाचा…“तानाजी सावंत अन् हसन मुश्रीफांचा राजीनामा घ्या,” ‘त्या’ घटनेवरून विजय वडेट्टीवारांची शिंदेंकडे मागणी
हेही वाचा…102 फॅरनहेट ताप, उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांची तब्येत बिघडली,उपोषणावर ठाम