मुंबई : महायुती सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली. यावरून भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी देखील नाराज झालेत. परंतु या महायुतीत भाजप मोठा भाऊ असून तिन्ही पक्षांना घेऊन आपल्याला चालायचं आहे. त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागला तरी चालेल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. आज मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची, जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस बोलत होते.
हेही वाचा…“शासकीय रुग्णालय मृ’त्यू’चा सापळा, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी”
भाजप हा महायुती आघाडीतील सर्वात मोठा भाऊ आहे. हे सरकार तीन पक्षाचं असलं तरी भाजप आपल्या धोरणापासून, ध्येयापासून दूर जाणार नाही. या दोन्ही पक्षांना आपण सोबत घेऊन जाऊन या दोन्ही पक्षांना समजून घेऊ. भाजपला त्याग करावा लागेल. सगळ्यांनी मेहनत घेतली तर आपण यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडू असा दावा देखील फडणवीसांनी कार्यकर्त्यांसमोर केला.
हेही वाचा…घाटी रूग्णालयात मृ’त्यू’चं थैमान..! खासदार हेमंत पाटलांनी रूग्णालयाच्या डीनलाच लावलं टॉयलेट साफ करायला
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर देखील हल्लाबोल चढवला. विरोधकांचा सध्या एकच संकल्प असून मोदींना विरोध करण यांच्याशिवाय त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही. आपलं दुकान बंद होईल म्हणून ते सर्व एकत्र आले आहेत. या विरोधकांच्या पाठीमागे एक शक्ती आहे. ज्यांना अराजकता निर्माण करायची आहे. चीनच्या पैश्यावर हे लोक अराजकता करत आहेत. त्यांना चीनकडून फंडिंग मिळत असल्याचा गंभीर आरोप देखील फडणवीसांनी केला आहे.
🕓 4pm | 3-10-2023 📍 Mumbai | संध्या. ४ वा. | ३-१०-२०२३ 📍 मुंबई.
LIVE | भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष बैठक. @BJP4Maharashtra @BJP4India #BJP #Maharashtra #BJPMaharashtra #Mumbai https://t.co/jZwq1TLLBg
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांचा रोहित पाटलांना थेट फोन, फडणवीसांनी दिलं आश्वासन, म्हणाले, “एक महिन्याच्या आत.., “
हेही वाचा…४-१-१ महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरला, मुंबईतील लोकसभेच्या ‘या’ मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही
हेही वाचा…“सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत, पण औषधं घ्यायला पैसे नाहीत”, सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…रोहित पाटलांच्या उपोषणाला राष्ट्रवादीची साथ, जयंत पाटलांनीही केली फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…गोपीनाथ मुंडेंचे मावळे धावले पंकजा मुंडेंच्या मदतीला, तब्बल ‘इतक्या’ लाखांची केली मदत