मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची राज्यातील राजकीय पक्षांनी आता जय्यत तयारी सुरू केली आहे. यातच ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांनाच पुन्हा तिकीट देणार आहे. यावर अरविंद सावंत यांचा पराभव हा काळ्या दगडावरची पांढरी रेख असल्याचं भाजप आमदार आशिष शेलारांनी म्हटलंय. त्यावर काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी शेलारांवर जोरदार टोला हाणला आहे.
हेही वाचा…अजित पवार नाराज आहेत का ? शिंदे-फडणवीस तात्काळ दिल्लीला रवाना
आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचा पराभव हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. गेल्यावेळी ते आमच्या ‘मेहेरबानीवर’ जिंकले. नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो घेऊन प्रचारासाठी गेले. अकर्तृत्वान माणसालाही जिंकवण्याची किमया मोदी यांच्या नावात आहे. याकूब मेननची कबर सजविणाऱ्यांसोबत अरविंद सावंत मतं मागायला जात आहेत, याचा बदला दक्षिण मुंबईतील लोक निवडणुकीत घेतील. असं शेलारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“दोन्ही पक्षांना समजून घेऊ, भाजपला त्याग करावा लागेल”, फडणवीसांचा भाजपच्या कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश
दरम्यान, शेलारांच्या वक्तव्यावर सचिन सावंत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लोकसभा, महानगरपालिका नाही तर गेला बाजार तेवढी सिनेटची निवडणूक तरी लावा. या निवडणुकीत मोदी यांचा फोटा लावून लढलात तरी चालेल. अन् या निवडणुकीनंतर विद्यापीठातील सर्व काळ्या दगडांवर पांढरी रेख मारायचे कंत्राट आपल्यालाच देण्यात यावे ही मागणी आम्ही करू. असा शाब्दिक हल्लाबोल सावंतांनी केलाय.
शेलार साहेब, लोकसभा, महानगरपालिका नाही तर गेला बाजार तेवढी सिनेटची निवडणूक तरी लावा ना! मोदीजींचा फोटो लावून लढलात तरी चालेल. आणि हो निवडणुकीनंतर विद्यापीठातील सर्व काळ्या दगडांवर पांढरी रेघ मारायचे कंत्राट आपल्यालाच देण्यात यावे ही मागणी आम्ही नक्की करु! https://t.co/DKk0XU7OCH
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…टॉयलेट साफ करायला लावणं महागात पडलं, शिंदेंच्या ‘या’ खासदारवर गुन्हा दाखल
हेही वाचा…अजून किती तारखा…? शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी आणखी लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
हेही वाचा…अजित पवारांची नाराजी, भाजपचा अजित दादांना पाठिंबा, पण शिंदेंची आडकाठी, दिल्लीत काय झालं ?
हेही वाचा…फ्लेक्सबाजी करून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी पुनीत बालन यांना दणका, तातडीने ३ कोटी २० लाख भरण्याचे आदेश
हेही वाचा…“एक नाराज इंजिन फडणवीसांना जाऊन भेटलंय”,नाराजीच्या चर्चांवर सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला