पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या दोन प्लॉंटला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची नोटीस आली. यावरून रोहित पवारांनी राज्यातील दोन महत्वाच्या नेत्यांवर या प्रकरणावरून आरोप लावलेत. आता याप्रकरणावरून केस लढायला शासनाकडून बड्या वकीलांची फौज उभी केली जाईल, असा सुचक विधान रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, अन् काॅंग्रेस आणि भाजपमध्ये भांडण, पाहा नेमकं काय घडलं ?
रोहित पवारांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी कारवाईबाबत भाष्य केलं आहे. माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकूण जरा आश्चर्यच वाटलं. केवळ राजकीय द्वेश या एकमेव कारणामुळं माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही तर याव्यतिरीक्तही अनेक कारणं आहेत. असं म्हटलं आहे.
हेही वाचा…टॉयलेट साफ करायला लावणं महागात पडलं, शिंदेंच्या ‘या’ खासदारवर गुन्हा दाखल
दरम्यान, भविष्यात ही केस लढायला शासनाकडून बड्या वकिलांची फौज उभी केली जाईल, जी सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी कधीही उभी केली जात नाही. पण तरीही मी डगमगणार नाही. कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनीशी लढेल. कुणापुढे झुकणार नाही. कारण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. असं रोहित पवारांनी म्हटलंय.
माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकूण जरा आश्चर्यच वाटलं.
केवळ राजकीय द्वेश या एकमेव कारणामुळं माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री मिळालं, पण ‘या’ दोन जिल्ह्यासाठी अजित पवारांची ताकद पडली कमी
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित दादांकडे पुण्याचे पालकमंत्री पद, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी
हेही वाचा…“लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा व्हा,” शरद पवारांच्या ‘या’ भिडूकडून अजित पवारांना आवाहन
हेही वाचा…ठाकरे गटाकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी ठाकरे गटावर केलेत अप्रत्यक्ष आरोप
हेही वाचा…लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुकानंतरच होणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर