पुणे : मागील काही दिवसापासून पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. पुणे, सातारा, रायगड, नाशिक यासह अनेक जिल्ह्याचं पालकमंत्री पदासाठी अजित पवार गट आग्रही आहे. यातच मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या. यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केल्यानंतर आज शिंदेंनी ११ पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. यात अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं.
हेही वाचा…टॉयलेट साफ करायला लावणं महागात पडलं, शिंदेंच्या ‘या’ खासदारवर गुन्हा दाखल
भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटलांकडे अमरावती आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीत राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बुलढाणा, धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गोंदिया, धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, संजय बनसोडे यांच्याकडे परभणी तर अनिल पाटील यांच्याकडे नंदूरबारची जबाबदारी दिली आहे.
हेही वाचा…अजून किती तारखा…? शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी आणखी लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
दरम्यान, सातारा आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिंदे सोडण्यास तयार नाहीत. तर यासाठी अजित पवार आग्रही आहेत. यामुळेच की काय अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून सुरू होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली ११ पालकमंत्री पदाची सुधारीत यादी
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित दादांकडे पुण्याचे पालकमंत्री पद, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी
हेही वाचा…“लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा व्हा,” शरद पवारांच्या ‘या’ भिडूकडून अजित पवारांना आवाहन
हेही वाचा…ठाकरे गटाकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी ठाकरे गटावर केलेत अप्रत्यक्ष आरोप
हेही वाचा…लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुकानंतरच होणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर
हेही वाचा…लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, अन् काॅंग्रेस आणि भाजपमध्ये भांडण, पाहा नेमकं काय घडलं ?