पुणे : अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवारांना मिळावं, यासाठी अजित पवार गट आग्रही होतं. यातच आता दोन दिवसापासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते. यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ पालकमंत्री पदाची सुधारीत यादी जाहीर केली आहे.
हेही वाचा…अजून किती तारखा…? शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी आणखी लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
चंद्रकांत पाटील यांचं पुण्यातील पालकमंत्री पद जाणार अशा चर्चा होत्या. यातच अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री मिळावं, यासाठी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही जोरदार मागणी होत होती. यातच आता चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले हे. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांची नाराजी, भाजपचा अजित दादांना पाठिंबा, पण शिंदेंची आडकाठी, दिल्लीत काय झालं ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली ११ पालकमंत्री पदाची सुधारीत यादी
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
READ ALSO :
हेही वाचा…“लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा व्हा,” शरद पवारांच्या ‘या’ भिडूकडून अजित पवारांना आवाहन
हेही वाचा…ठाकरे गटाकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी ठाकरे गटावर केलेत अप्रत्यक्ष आरोप
हेही वाचा…लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुकानंतरच होणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर
हेही वाचा…लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, अन् काॅंग्रेस आणि भाजपमध्ये भांडण, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…टॉयलेट साफ करायला लावणं महागात पडलं, शिंदेंच्या ‘या’ खासदारवर गुन्हा दाखल