नाशिक : एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली असून पालकमंत्री पदाचा तिढा सोडविला. परंतु शिंदे आणि अजित पवार गटात काही जिल्ह्यांवरून सुरू असलेला वाद अद्यापही तसाच आहे. सातारा, रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील वाद अजूनही तसाच आहे. यातच नाशिकचा गड मंत्री दादा भुसे यांनी राखल्याची चर्चा आता सुरू आहे.
हेही वाचा…“लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा व्हा,” शरद पवारांच्या ‘या’ भिडूकडून अजित पवारांना आवाहन
मागील काही दिवसापासून पालकमंत्री पदावरून अजित पवार गट आक्रमक झालाय. यातच अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्याही समोर आल्या. त्यानंतर काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन चर्चा करत पालकमंत्र्यांची यादी आज जाहीर केली. यातच नाशिकच्या पालकमंत्री बदलाची अलिकडे जोरदार चर्चा सुरू होती. याठिकाणी छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत होतं. मात्र दादा भुसेंनी आपलं पालकमंत्रीपद राखल्याची आता चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी ठाकरे गटावर केलेत अप्रत्यक्ष आरोप
दरम्यान, रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. पुण्यात अजित पवार यांना पालकमंत्री पद मिळाले आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत. नाशिक जिल्ह्यात पाच विधानसभा आमदार आहेत. याविषयीची चर्चा सुरू आहे. आपला या पदासाठी आग्रह नाही, परंतु राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असल्याचं छगन भुजबळांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण भरत गोगावलेंना संधी नाहीच, गोगावले म्हणाले की, “देवीच्या मनात असेल तर..,”
हेही वाचा…“खोके सरकार म्हणजे अजित पवार पण त्यात आहेत का?”शिंदेंच्या मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
हेही वाचा…“शासनाकडून बड्या वकिलांची केस उभी केली जाणार,” बारामती अॅंग्रोबाबत रोहित पवारांचं मोठं भाकित
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री मिळालं, पण ‘या’ दोन जिल्ह्यासाठी अजित पवारांची ताकद पडली कमी
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित दादांकडे पुण्याचे पालकमंत्री पद, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी