पुणे : मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन एका माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी एका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विद्येच्या माहेरघरात लोकप्रतिनिधीच अशा घटनांमध्ये सापडत आहेत तर सर्वसामान्य लोकांचं काय होत असेल ? असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…मुंबईतील सहापैकी ‘या’ तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही, लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे अन् काॅंग्रेसमध्ये संघर्ष होणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित माजी नगरसेविकाने सचिन मच्छिंद्र काकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी काकडे आणि पीडित नगरसेविकेचे खुप दिवसापासून मैत्री संबंध होते. समाजमाध्यमात छायाचित्रे, ध्वनिचित्रफित प्रसारीत करण्याची धमकी काकडे याने तिला दिली. त्यानंतर त्याने धमकावरून नगरसेविकेवर वेळोवेळी बलात्कार केला. सन २०१७ पासून नगरसेविकेला धमकावून काकडे यांनी अत्याचार केले होते. यासोबत पीडिताकडून दहा लाख रूपये देखील उकळले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा…दादा भुसेंनी नाशिकचा गड राखला, भुजबळांनी थेट संख्याबळच दाखवलं, पालकमंत्री पदावरून तिढा कायम
दोन दिवसांपुर्वी काकडे तिच्या घरी आहे. तु दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने पीडित नगरसेविकेला मारहाण केली. अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून तिने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. यापुढील तपास आता पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे करीत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, जागा वाटपासाठी समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समावेश
हेही वाचा…शरद पवारांना सर्वात मोठा धक्का..! राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराचं लोकसभेतून निलंबन
हेही वाचा…“एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही”, बच्चू कडूंचं थेट भाजपलाच आवाहन
हेही वाचा…अजित पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, फटाके फोडत कार्यकर्त्यांचा जल्लोष
हेही वाचा…आमदारांना ५००-५०० कोटींचा निधी, आरोग्य व्यवस्थेला ५० कोटी दिले असते तर आज शेकडो जीव वाचले असते