बीड : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर आता अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. याचाच प्रत्यत बीडच्या राजकारणात येतांना दिसत आहेत. शहरातील विकासाच्या दृष्टीने निधी उपलब्ध व्हावा या हेतूने अजित पवार गटात प्रवेश करावा अशी पुतण्याची इच्छा होती, मात्र काका त्यावर मानण्यास तयार नाहीत. यामुळे पुतण्यांनी काकांचा आदेश झुगारत अजित पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे आणखी ३ आमदार अजित पवार गटात जाणार, ? शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ “
बीड जिल्ह्यातील क्षीरसागर कुटुंब राजकारणात मागील काही वर्षापासून सक्रीय आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी आपल्या काकांना अजित पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काका जयदत्त क्षीरसागर यांनी नाकार दिला. यामुळे काकांचा आदेश झुगारून योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…अजित पवार बारामतीत जाणार, भव्य मिरवणुक अन् जंगी स्वागत, अजितदादांच्या कार्यक्रमाची चर्चा
दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केलाय. जयदत्त क्षीरसागर यांना डावलून योगेश क्षीरसागर यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, सरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन त्यांच्यासोबत प्रवेश केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार”
हेही वाचा…भारताची चांद्रयान- ३ मोहिम फत्ते, मुख्यमंत्र्यांसह, राज्यातील नेत्यांनी मानले इस्रोचे आभार
हेही वाचा…शरद पवारांसह ठाकरे, अशोक चव्हाणांची मुंबईत बैठक, इंडिया मुंबईत जोरदार बॅंटिंग करणार
हेही वाचा…“आता पापी गद्दारांना राजकारणातून संपवायचं,” उद्धव ठाकरे गडाडले, नगरचा माजी खासदार ठाकरे गटात
हेही वाचा…शेतकऱ्यांची कांदाकोंडी भारती पवारांनी फोडली, उद्यापासून नाशकात कांदा लिलाव