मिळालेल्या माहितीनुसार, असदुद्दीन ओवैसी वाराणसी विमानतळावर पोहचताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. तर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ओवैसी यांनी जेव्हा आम्ही कोणतीही निवडणूक लढवतो तेव्हा ती जिंकणं हाच आमचा उद्देश असतो असं देखील म्हटलं आहे. ओवैसा आणि राजभर आझमगड आणि मऊ येथील कार्यकर्त्यांसोबत बैठक करणार आहेत. तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट देखील घेणार आहेत. आगामी निवडणुकांसाठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत.
“मला भारताच्या राजकारणाची लैला बनवलं आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच” असं याआधी ओवैसी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भारतीय ट्रायबल पार्टी आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोबत आले आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बीटीपी आमदार छोटूभाई वसावा यांनी माहिती दिली. वसावा म्हणाले, बीटीपी आणि एआयएमाआयएम संविधान वाचविण्यासाठी एकत्रितपणे राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत.
Read Also
कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचे काम जगात सर्वोत्तम – फडणवीस
उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार, ऊर्जामंत्र्यांची ग्वाही