मुंबई : कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम जगात सर्वोत्तम असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कोरोना विरुद्धच्या लढाईत केलेल्या कामाची माहिती देणारे आमदार अतुल भातखळकर लिखित पुस्तिका व माहितीपट ’56 इंचाची ढाल’ चे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे व धाडसी निर्णयामुळे 130 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश कोरोनाच्या हाहाकारापासून सुरक्षित राहू शकला.
कोरोना विरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम जगात सर्वोत्तम आहे. या काळात संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता होती. परंतु, प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची मानसिकता असणाऱ्या विरोधी पक्षांनी निरर्थक आरोप करण्याचेच काम केले, असेही ते यावेळी म्हणाले.
Read Also :
- ‘त्या’ खुलाशानंतर धनंजय मुंडेंचे पहिले ट्विट…
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप, नवाब मलिक म्हणाले…
- भंडारा प्रकरण : विदर्भातील मोठ्या नेत्याच्या दबावामुळे आरोपींवर कारवाई नाही ? भातखळकरांचा सरकारवर निशाणा
- ‘गांधीजींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- … अन् महिलेने भररस्त्यात राज्यमंत्री भरणे यांची कॉलर धरली