पुणे : राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची भररस्त्यात एका महिलेने कॉलर पकडल्याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलावरती दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप महिलेने केला होता.
खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी इंदापूर तालुक्यातील रेडणी गावतील महिला भरणे यांच्या घरासमोर उपोषण करत होती.
उपोषण करणाऱ्या महिलेला राज्यमंत्री भेटण्यासाठी गेले असता, त्या महिले जाब विचारत त्यांची कॉलर पकडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र यावेळी भरणे यांनी संयमपणे परिस्थिती हाताळली.
या प्रकरणाबाबत एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना भरणे यांनी सांगितले की, त्या माझ्या शर्टाला हात लावून माझ्याशी बोलत होत्या. माझा आणि त्यांचा कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत, शिवीगाळ झाल्याचा गैरसमज त्यांच्याकडून झाला होता. त्यांच्या मुलावरती खोटा गुन्हा दाखल केल्याचा गावातूनही मला सांगितले जात आहे, जर हा खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर प्रफुल्लच्या केसाला देखील कोणाला हात लावू देणार नाही.
Read Also :
- नारायण राणेंना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच – राऊत
- मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, गिरीश महाजनांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- सर्वात प्रथम मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह टिव्हीवर लस घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी
- ‘आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा सोडा’, खोत यांचा शेट्टींना टोला
- ‘तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही’, राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल