मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे हे सर्व आरोप फेटाळले आहेत. याशिवाय मुंडे यांनी आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीसोबत आपण सहमतीने संबंधांत होतो, असाही गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
तक्रार झाल्यानंतर चौकशी होणार. या आरोपांच्या चौकशीनंतर सत्य काय ते समोर येईल. याबाबत आपण फार काही बोलू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांनी दिली आहे.
नवाब मलिक म्हणाले की, एखादी तक्रार झाली तर त्याची चौकशी होत असते. पण आरोप करणारी महिला त्यांची नातेवाईक आहे. तक्रारदाराच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांनी लग्न केलेले असून, उभयतांना दोन मुलेसुद्धा आहेत. याच्यामागे काय कारण आहे ते चौकशीत सगळे समोर येईल.
एखाद्या महिलेसोबत त्यांचं लग्न आधी झालेलं आहे, त्यांची मुलं आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकत होत्या. कोर्टाकडून काही तरी आदेश आणला. आता त्यांच्या बहिणी समोर येत आहेत. चौकशीनंतरच काय ते समोर येईल, त्यावर फार काही बोलू शकणार नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सर्व आरोप फेटाळले आहेत. सोबतच करूणा शर्मा आणि मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. तसेच आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा मोठा खुलासा देखील त्यांनी केला आहे.
Read Also :
- भंडारा प्रकरण : विदर्भातील मोठ्या नेत्याच्या दबावामुळे आरोपींवर कारवाई नाही ? भातखळकरांचा सरकारवर निशाणा
- ‘गांधीजींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- … अन् महिलेने भररस्त्यात राज्यमंत्री भरणे यांची कॉलर धरली
- नारायण राणेंना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच – राऊत
- मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, गिरीश महाजनांचे कार्यकर्त्यांना आवाहन