मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने ट्विट करत बलात्काराचे आरोप केले आहे. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार देखील केली आहे. महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी ट्विट न करता फेसबुक पोस्टद्वारे आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत, मात्र सोबतच अनेक गौप्यस्फोट पण केले.
मुंडे यांनी आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीसोबत आपण सहमतीने संबंधांत होतो. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली व याबाबत कुटुंबिय व मित्र परिवाराला माहिती असल्याचा खुलासा देखील त्यांनी केला.
तसेच, करूणा शर्मा यांच्याविरोधात आपण आधीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहित मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र त्यांनी कोणतेही ट्विट केले नव्हते.
आरोप फेटाळणाऱ्या फेसबुक पोस्टनंतर त्यांनी पत्रकार महेंद्र महाजन यांच्या ट्विटला उत्तर देणारे पहिले ट्विट केले आहे. ट्विटमध्ये नाशिकच्या एका विद्यार्थीनीला जात पडताळणीचा दाखला वेळेत मिळाल्याने मुंडेंचे आभार मानले आहेत.
कोणत्याही विद्यार्थ्याची जात पडताळणी अभावी शिक्षणाची संधी हुकणार नाही यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि आमचा सामाजिक न्याय विभाग सदैव तत्पर राहील. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा ! https://t.co/VAtxilCbkO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 12, 2021
यावर उत्तर देताना मुंडे यांनी ट्विट केले की, कोणत्याही विद्यार्थ्याची जात पडताळणी अभावी शिक्षणाची संधी हुकणार नाही यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि आमचा सामाजिक न्याय विभाग सदैव तत्पर राहील. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी खूप शुभेच्छा.
Read Also :
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप, नवाब मलिक म्हणाले…
- भंडारा प्रकरण : विदर्भातील मोठ्या नेत्याच्या दबावामुळे आरोपींवर कारवाई नाही ? भातखळकरांचा सरकारवर निशाणा
- ‘गांधीजींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- … अन् महिलेने भररस्त्यात राज्यमंत्री भरणे यांची कॉलर धरली
- नारायण राणेंना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच – राऊत