पुणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिंदे गटात हमरीतुमरी वाढलेली दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचं देखील शिंदे गटाने सांगितलं आहे. अशातच शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर प्रखरशब्दात टिका केली आहे. त्याला राष्ट्रवादीच्या पुणे शहाराच्या उपाध्यक्ष रूपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, दादा हा शो नाही, पहाटेच्या फ्लॉप शो सारखा, हा शो’ ले आहे. एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा. आणि हो. हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ट्रेलर नेच धडकी भरली? पिच्चर अभी बाकी है असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
पहाटेचा ज्या दिवशी शो होता, तिथे कोणत्याही प्रकारच्या लोकशाहीचा खून करण्यात आलेला नव्हता. तिथे पन्नास खोक्क्यांचा विषय़ नव्हता. अजित पवार यांच्यावर टिका करण्याएवढं तुम्ही मोठे नाहीत. अजित पवारांवर टिका करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांना पाठवायला लागेल. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
आज संपुर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की तुम्ही हिंदुत्वाशी, उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. इडी आणि सीबीआय यांना घाबरून तुम्ही भाजपसोबत संसार थाटला आहे. अजित पवार यांनी अशा प्रकारचा कोणत्याही प्रकार केला नाही. तसेच मराठीत एक म्हण आहे की लहान तोंडी मोठा घास परंतु आता ती असं म्हणता येईल की बच्चा बाप को भेज. असा टोला देखील रूपाली पाटील यांनी हाणला आहे.
Read also
- “आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
- “तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
- “उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल
- “पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”
- “मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल