मुंबई : 35 वर्षे आम्ही काय केले हे कोणाला माहित नाही. कोणी झेंडा लावायला तयार नव्हते, तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही, तडीपारी भोघणारे आम्ही, 302 भोगणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही आणि ते 32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टिका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असा टोला शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांना लगावाला आहे.
“52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
तुम्ही संपत्तीचे वारसदार होऊ शकता, विचारांचे नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत. उद्धव ठाकरे यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे मात्र आदित्य ठाकरेंना आमच्यावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणातात की तेरा क्या होगा कालिया? जो होगा वो होगा गब्बर सिंग ठरवेल क्या होगा.., असा टोला गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.
“5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
मी गुवाहाटीला गेलो तेव्हा पत्नी-मुलाचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितले. ज्याप्रामाणे अली बाबा और उसके चालीस चोर थे, तसं आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत. या शब्दात इतिहास लिहला जाईल, असं पाटील म्हणाले.
“त्रिकोण, चौक दाखवा जिथे माझ्या आईबापाचं नाव दिले, बापाची प्रॉपर्टी आहे का?”
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असं केलं तर सरकार वाचेल. मात्र त्यावेळी त्यांनी उडाले ते कावळे, राहिले ते मावळे अशी भाषा वापरली. 35 वर्षे एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आज आमच्यावर टिका करतात. याची लाज वाटते. ‘चहा पेक्षा किटली गरम’, असं म्हणत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
Read also
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
- एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
- “तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड
- बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा