मुंबई : शिवसेना आपल्या मुखपृष्ठ असणाऱ्या सामानामधून भाजपचा उल्लेख सातत्याने कमळाबाई अशा प्रकारे करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहराचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आम्ही आता पेंग्विन सेना तुम्हाला म्हणायचे का? असा सवाल देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांच्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जहरी टिका केली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रात आशिष शेलार यांनी असं म्हटलं आहे की, आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय? हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचे का ? असा टोला देखील त्यांनी हाणला आहे. तसेच सरतेशेवटी असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत. असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं.
“भाजपचे राज्यातील अध्यक्षही अनभिज्ञ, त्यांना माहित झाल्यावर..;”रोहित पवारांचा खोचक टोला
52 पत्ती कितीदा पिसली तरी चार एक्का येतील आणि हे चार एक्के सध्या भाजपकडे आहेत. नरेंद्र मोदी यांच्या उंचीचे नेते यांच्या पक्षात दुर्मिळ आहेत. त्यामुळे यांना याचा शोध घ्यावा लागत आहे. तसेच नरेेंद्र मोदी यांची बरोबरी करणारा एखादा नेता असता तर बरोबर दिसला असता. मानसिक कमजोरी असून भाजपला कमळाबाई म्हटल्यावर पक्षाचा अवमान होईल, अशी त्यांनी मनात भावना आहे. असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
“शहाजी बापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही”
कोणतीही आई पहिल्यांदा बाई असते. स्त्रीच्या संदर्भात अशी भावना, निम्म शब्द ती अबला आहे, कमजोर आहे असं म्हणणं म्हणजे भाजप ही कमजोर आहे. अबगा आहे असं भाव व्यक्त करणं म्हणजे आठराव्या शतकातलं द्दोतक आहे. क्रांतीबाई सावित्रीबाई फुले यांचा वारसा यांना कधी समजलाच नाही. भाजपचा अपमान करण्यासाठी कमळाबाई म्हणणं ही भावनात मानसिक बुद्धी कमी आहे. याचे उदाहरण आहे. अशी टिका देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
Read also
- “5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
- “त्रिकोण, चौक दाखवा जिथे माझ्या आईबापाचं नाव दिले, बापाची प्रॉपर्टी आहे का?”
- “राजकारण हा माझा धंदा नाही, तर हे माझं व्रत आहे”; खासदार गिरीश बापट
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सबुरीचा सल्ला
- “ज्याच्याकडे पाहून बाप्पालाही हसू येईल, तो केवढा मोठा जोकर असेल”; सोमय्यांवर काॅंग्रेसचा प्रहार