पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर विरोधी पक्ष आता सातत्याने शिंदे सरकारवर टिका करताना दिसत आहे. अशातच मुंबई भाजपने महाविकास आघाडी सरकारवर वादग्रस्त जाहीरातबाजी केली आहे. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावरून भाजपवर कडाडून टिका केली आहे.
“दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा
त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आपले सरकार आले आणि हिंदू सणांवरील विघ्न टळले. ही मुंबईतील भाजपची बॅनरबाजी पाहून आश्चर्य वाटलं. कोरोनामुळे लोकहितासाठीच निर्बंध घातल्याने आपल्याला उत्साहात सण साजरे करता आले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. शिवाय केंद्रानेही तशा सूचना राज्यांना दिल्या होत्या. हे लोकांनाही माहीत आहे.
“मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, या जाहिरातबाजीबाबत कदाचित भाजपचे राज्यातील अध्यक्षही अनभिज्ञ असावेत, याबाबत त्यांना माहित झाल्यावर ते यात नक्कीच सुधारणा करतील. असं वाटतं कारण एकतर हे बॅनर चुकीचे आहेतच पण त्यावर अपेक्षित अनेक नेत्यांचे फोटोही मिसिंग दिसतायेत. असा शेरा देखील रोहित पवार यांनी मारला.
“राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपची जोरदार फिल्डिंग सुरू आहे. ते शिवसेना आणि राष्ट्रवादीला डच्चू देण्यासाठी भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यानंतर आता भाजपला मोठी ताकद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “शहाजी बापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही”
- “ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले, ते सध्या बेडकासारख्या उड्या मारताय”; रामदास कदम
- “ज्यांच्याकडे सत्ता असते, ते हव्या त्या गोष्टी करतात”; अजित पवार
- “राज ठाकरेंचा आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला “; शिवसेनेची राज ठाकरेंवर टिका
- “शिवसेनाप्रमुख म्हणून नाही पण प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार “; सदा सरवणकर