ठाणे : एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांची गद्दारी जनतेला आवडलेली नाही. त्यामुळे जनता त्यांच्याकडे पाठ फिरवत आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. याला दानवे यांनी जास्त फडफड करू नये. नाही तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर शिंदे गटातील ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी दानवे यांना दिले आहे.
“आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”
अंबादास दानवेंना विचारतं कोण? अंबादास दानवेंनी जास्त फडफड करू नये, नाहीतर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना नेतेपद मिळावं यासाठी एकनाथ शिंदेंनी किती मेहनत घेतली ते विचारा. आता ठाणे आठवलं का त्यांना? जास्त बोललं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा नरेश मस्के यांनी दानवेंना दिला आहे.
”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुले फक्त मंत्र्यासाठी देव कोरडेच, अशी टिका सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावर बोलताना नरेश मस्के म्हणाले की, सामनातून आमच्यावर केलेली टिका म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी..ज्यांनी कुणी हा आग्रलेख लिहिला आहे त्याचे धन्यवाद देईन की त्याने हे मान्य केलं ते हिंदूत्व टिकवू शकले नाहीत, असंही नरेश मस्के म्हणाले.
“मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
यावर्षींचा दसरा मेळावा कोणत्या पक्षाचा होणार याबाबत यंदाचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचाच होणार आणि तो देखील शिवाजी पार्कमध्ये होणार, असं मस्के म्हणाले. ठाकरे यांना मेळावा घेणयाचा अधिकार नाही. हा अधिकार केवळ बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना आहे..म्हणजे एकनाथ शिंदे यांना आहे, असा टोला लगावला आहे.
Read also
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
- “राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला
- काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान
- “शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध
- “प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल