अकोला : अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर शिवा मोहोड यांनी आमदार मिटकरी यांच्यावर कमिशनखोरीचे आरोप केले होते. त्यावर मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. या प्रश्नाला शिवा मोहोड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड
आमदार मिटकरींचं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या एका महिलेचं प्रकरण निपटण्यात आलं. या प्रकरणात पाया पडणाऱ्या मिटकरींचे व्हिडीओ आपल्याकडे आहेत. आपल्यावर चारित्र्याचे आरोप करणाऱ्या मिटकरींनी त्याचे पुरावे द्यावेत. नाहीतर दहा दिवसांनंतर सर्व पुरावे आपण माध्यमांसमोर उघड करणार आहे, असा इशारा अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी मिटकरी यांना दिला आहे.
“भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
मिटकरी यांनी एका महिलेच्या संदर्भातील प्रकरण अकोल्यातील एका महिला पदाधिकाऱ्याला 10 लाख रूपये देऊन निपटवले. मिटकरींनी तीन दिवस अकोल्याच्या विश्रामगृहावर ठेवलेली पुण्यातील पदाधिकारी कोण होती? असा सवाल शिवा मोहोड यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
माझ्याकडे व्हॉट्सअप चॅटिंग आहे. यात मिटकरींनी कमिशनचे 1 लाख परत केल्याचा दावा केला आहे. मिटकरींनी केशवनगरात घेतलेल्या 80 लाखांत घेतलेल्या भुखंडाचा स्त्रोत काय आहे? 30 लाखांची फोरव्हिलर कुठून घेतली? असा सवाल मोहोड यांनी उपस्थित केला आहे. मिटकरींनी आपल्या चरित्र्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर भरचौकात फाशी घेईन, असं देखील मोहोड म्हणाले आहेत.
Read also
- “शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला
- “तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी
- “राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
- “शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी