मुंबई : मुबंईमध्ये बीईएसटीच्या बसेसवर भाजपकडून जहिराती लावण्यात आल्या आहेत. भाजपने या बसेसवर जहीरातींच्या माध्यमातुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावरून आता शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने बीईएसटीच्या बसेसवर केलेली बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा आहे, अशी टिका शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांंनी केली आहे.
“शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं
भारतीय जनता पार्टीने सार्वजनिक मालमत्ता असणाऱ्या बीईएसटीच्या बसेसवर आपले सरकार आले आणि हिंदु साणांवरचे संकट टळले अशी जहिरात करण्यात आली आहे. यापेक्षा कोणताही थिल्लरपणा असु शकत नाही. कोरोना ही जागतिक महामारी होती. त्यामुळे संपुर्ण जग थांबलेलं होतं. वैज्ञानिकांच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे यांनी हे निर्बंध संकटकाळात आणले. मात्र हळुहळु आपण हे निर्बंध आपण शिथिल देखील केले. परंतु अश्या प्रकारे जहिरातीसाठी परवानगी घेतली आहे का?, असा सवाल शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.
“येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा”; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
भारतीय जनता पार्टीने कोरोना काळात रोज उठुन आरडाओरडा केला. निर्बंध उठवा, देवळे उघडा, अमुक करा अशी मागणी केली. मात्र भाजपने ज्या यात्रा काढल्या, त्यामुळे कोरोना राज्यात मोठ्या प्रमाणात पसरला. भारतीय जनता पार्टीने कोरोना महामारीत बेजबाबदारपणा दाखवला. या गोष्टीचा निषेध शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका
सोबतच, आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जाणाऱ्या वरळीत शिंदे गटाकडून पोस्टर लावण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी वरळीत आपलं राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आल्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ युवासेनेवर ही हक्क सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Read also
- शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
- “बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार
- आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
- “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
- “ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला