पुणे : राज्यात अडीच वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोणत्याही निर्बंधाशिवाय सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या घरी गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात केलं आहे. रासपचे नेते महादेव जानकर यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी मागणी केली आहे.
अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
एनडीएमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आहे. रासपच्या शिंदे सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, अशी मागणी रासपच्या महादेव जानकर यांनी केली आहे.
अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्यांची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आलेली आहे. यावर पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार आहेत. वडील गोपिनाथ मुंडे यांचं आयुष्य भाजपमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे त्या भाजप पक्ष सोडणार नाहीत, असं रासपचे नेते महादेव जानकर म्हणाले.
“मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
शिंदे-फडणवीस सरकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या विस्तारात आता कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. शिंदे सरकारच्या पहिल्या विस्तारात एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने विरोधीपक्षाकडून जोरदार टिका झाली आहे. तर अपक्ष आमदारांना मंत्रिपद न दिल्याने अपक्ष आमदार नाराज असल्याची चर्चा देखील आहे. आमदार बच्चू कडू यांनी ही मंत्रिपदाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
Read also
- “ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला
- “शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं
- “येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा”; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- “उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं