मुंंबई : दोन वर्षांनंतर आज राज्यात गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात केलं जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही घरच्या गणरायाचे आगमन अगदी उत्साहात केले. यासोबतच शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनीही त्यांच्या सांगोल्यातील घरी गणपतीचे आगमन मोठ्या जल्लोषात केले आहे. यावेळी त्यांनी मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी, असं साकडं गणपतीला घातलं आहे.
“शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर
गणपतीच्या चरणी माझी प्रर्थना राहील की, मोतोश्रीच्या अंगणात सुद्धा सुख, शांती, आनंद भरभरून द्यावा, असं साकडं घालत. आमच्या रश्मी वहिनी आनंदित राहव्यात, अशी प्रार्थना देखील गणरायाला करतो, असं बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले. आमच्या भागात पाऊस झालेला नाही, गणपतीकडे प्रार्थना करतो की या भागात दोन दिवसात चांगला पाऊस द्यावा, अशीही प्रार्थना शहाजी पाटील यांनी गणरायाकडे केली आहे.
“संमेलन बघून कुंभमेळाची आठवण झाली”; गिरीश महाजन
राष्ट्रवादीचे आमदार अमोेल मिटकरी यांनी शहाजी बापू पाटील म्हणजे राजकारणातील जॅनी लिव्हर आहेत अशी टिका केली होती. यावरून अमोल मिटकरी हे विचार करण्यासारखं राजकारणातलं पात्र नाही. मिटकरी हा सोगाड्या आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुरूंगात गेल्यामुळे त्यांची जागा मिटकरींना मिळाली आहे. आपल्याला आता टिव्ही समोर जावं असं त्यांना वाटत आहे, असं आमदार शहाजी पाटील म्हणाले.
“शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”
आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. दोन वर्षानंतर कोरोनाची साथ नियंत्रणात आली असून यावर्षी राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षीचे सगळेच सण मोठ्या उत्साहात साजरे करा. आजपासून महाराष्ट्राच्या विकासाचा श्रीगणेशा करूयात, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
Read also
- “55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार, त्यामुळे दसरा मेळावा आम्हीच घेणार”; शंभुराज देसाई
- श्रीकांत शिंदेंवर सोपवणार मोठी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंचं पद जाणार
- “माझ्या जिल्हा प्रमुखांविरोधात निवडून दाखवा”; शहाजी बापुंना शिवसेनेचे ओपन चॅलेंज
- “एकनाथ खडसेंचं वय झालं आहे म्हणून आम्ही त्यांना दुर्लक्ष करतोय”; खडसेंविरोधात मोठा गौप्यस्फोट
- “एकेकाळी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार, असं म्हणणारा खासदार शिंदे गटात”