मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठा भुकंप झाला. सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना कोणाची यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तो वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. तरी देखील एकनाथ शिंदे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना दिसत आहेत. त्यात आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना युवासेना प्रमुख करावं अशी मागणी केली जात आहे.
“शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”
शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यावर भेट घेतली. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना युवासेनेचे प्रमुख म्हणुन नेमणुक करावी अशी मागणी केली आहे. युवासेना प्रमुख पद हे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. मात्र शिवसेनेसोबत आता युवासेनेवरही हक्क सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
“गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”
शिवसेनेची संघटना आम्ही बांधली. युवासेनेच्या बाबत लोकांना आवडणारा, युवकांमध्ये रमणारा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांची युवासेना प्रमुखपदी निवड करावी, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
“आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेना कोणाची हा वाद सध्या केद्रिंय निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी मुदत दिली आहे. परंतु दुसरीकडे कोर्टाने निवडणूक आयोगाला निकाल येईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी सुचना दिली आहे.
Read also
- “माझ्या जिल्हा प्रमुखांविरोधात निवडून दाखवा”; शहाजी बापुंना शिवसेनेचे ओपन चॅलेंज
- “एकनाथ खडसेंचं वय झालं आहे म्हणून आम्ही त्यांना दुर्लक्ष करतोय”; खडसेंविरोधात मोठा गौप्यस्फोट
- “एकेकाळी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार, असं म्हणणारा खासदार शिंदे गटात”
- “शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर
- “संमेलन बघून कुंभमेळाची आठवण झाली”; गिरीश महाजन