पुणे : पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी केली. पुण्यात शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या समोर निदर्शने करण्यात आले. यावेळी माझा जिल्हा प्रमुख पाटवतो त्यांच्यासमोर उभा राहून तुम्ही जिंकून दाखवावे, असं आवाहन सचिन अहिर यांनी बंडखोर आमदार शहाजी बापु पाटील यांना दिला आहे.
“गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”
माझा जिल्हा प्रमुख पाटवतो त्यांच्यासमोर उभा राहून तुम्ही जिंकून दाखवावे. सत्तेसाठी इकडे तिकडे करणाऱ्याने काहीही बोलू नये, असा टोला सचिन अहिर यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना लगावाला आहे.
“आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईतील एका रस्त्याच्या चौकशीसाठी राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत चौकशीची मागणी केली होती. जर मुंबईमध्ये रस्त्याची चौकशी करायची असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली जो भ्रष्टाचार झाला, पुणे महानगरपालिकेत जे घोटाळे झाले, त्याचीही चौकशी कॅगमार्फत व्हावी यासाठी आम्हीही आंदोलन निदर्शन करत आहे. जर चौकशी होत नसेल तर आम्ही लोकांमध्ये जनजागृती करून आंदोलन करू, असं मागणी सचिन अहिर यांनी केली आहे.
“दसरा मेळावा शिंदे गट घेऊ शकतो, मात्र शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार”
दरम्यान, रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बाळासाहेब ठाकरेंचे एकनाथ शिंदे हे उत्तराधिकारी आहेत. एकनाथ शिंदे खरे हिंदुत्वाचे नेते आहेत असं म्हटले आहेत. त्यावर जसे रामदेव बाबांचे फोटो बदलतात. काही दिवसापूर्वी ते आदित्य योगीनाथ यांना सुद्धा चांगले म्हणत होते. त्यामुळे रामदेव बाबाचे एवढे काही मनावर घेऊ नका प्रोडक्ट नुसार रामदेव बाबा बदलतात, असा टोला सचिन अहिर यांनी लगावला आहे.
Read also
- “एकनाथ खडसेंचं वय झालं आहे म्हणून आम्ही त्यांना दुर्लक्ष करतोय”; खडसेंविरोधात मोठा गौप्यस्फोट
- “एकेकाळी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार, असं म्हणणारा खासदार शिंदे गटात”
- “शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर
- “संमेलन बघून कुंभमेळाची आठवण झाली”; गिरीश महाजन
- “शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”