मुंबई : एकनाथ खडसे यांनी ज्या पद्धतीने मांडलं की त्यांनी दुध संघ वाचवला आहे. मात्र एनडीबीने दुध संघाकडे दिलं, त्यावेळी किती रूपयांना वस्तु होत्या, किती प्रमाणात साठा होता, याचा सर्व डाटा माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर याबाबत बोलेन. एकनाथ खडसेंचं वय झालं आहे, म्हणून आम्ही दुर्लक्ष करतो, असा टोला भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
“आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नोकर भरतीमध्ये आपण कितीही मोठ्याने सांगितले की यामध्ये काहीही झालेलं नाही. मी तुमच्या समोर ज्या ज्या लोकांकडे नोकर भरतीची मागणी झाली आहे ते, ज्या लोकांनी नोकरीसाठी पैसे भरले आहेत ते, अशा अनेक क्लिप माझ्याकडे आहेत. त्या क्लिप मी योग्य वेळी सादर करेन, असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.
“दसरा मेळावा शिंदे गट घेऊ शकतो, मात्र शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार”
दुध संघामध्ये खुप गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. यामध्ये राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे शासनाचे 9 कोटी रूपयांचे नुकसान झालं आहे. त्यात दुध संघाचेही नुकसान झालं आहे. जर यांनी नियमात केलं होतं तर यांनी नियमात जाऊन तशी परवानगी घेणं अपेक्षित होतं. या दुध संघात कोणाचा लोण्यावर डोळा, तर कोणाचा तुपावर डोळा होता. काल या संदर्भात एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जो केणतीही परवानगी न घेता परस्पर तुप विक्रि करून केली. त्यामुळे संघाचे नुकसान होत होते, असही चव्हाण म्हणाले.
Read also
- “एकेकाळी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार, असं म्हणणारा खासदार शिंदे गटात”
- “शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर
- “संमेलन बघून कुंभमेळाची आठवण झाली”; गिरीश महाजन
- “शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”
- “गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”