मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा होणार नाही असं कधीच होत नाही. त्यामुळे या दसरा मेळाव्याची चर्चेला सुरूवात झाली आहे. परंतु दसरा मेळावा हा फक्त मेळावा, भाषण, गर्दी एवढ्यापुर्ता मर्यादित नसतो. हा मेळावा म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आणि विचारांचं सोन लुटण्याची नेहमीची परंपरा आहे. हा मेळावा होणार हे ठरलेलंच आहे. मागच्या 56 वर्षापासुन हा मेळावा होत आहे. आणि याही वर्षी तेवढ्याच ताकदीने होईल. शिवसैनिकाच्या मनात कोणताही संधेय असण्याचं कोणतही कारण नाही, असं दसरा मेळ्व्यावरून अंबादास दानवे म्हणाले.
“संमेलन बघून कुंभमेळाची आठवण झाली”; गिरीश महाजन
मेळावा जर शिंदे गटाला घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. त्याविषयी मी काही बोलायची गरज नाही. मात्र शिवसेनेचा मेळावा, शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा मेळावा होत असतो आणि तो शिवतीर्थावरच होणार. त्याच वेळेला आणि त्याच दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, असा इशारा विरोधी पक्षाला दिला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात महाप्रबोधन यात्रा निघणार आहे. यामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत, असही अंबादास दानवे म्हणाले.
“शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना थोरली आहे. कारण आमच्याकडे 55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार आहेत. त्यामुळे आमचीच शिवसेना थोरली असून दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
“गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”
माझ्या माहिती नुसार 89 व्या वर्षी पी. व्ही. नरसिंहराव कोणत्याही चर्चेत नसताना हिंदुस्थानचे पंतप्रधान झालेले आपण बघितलं आहे. त्यामुळे वय हा मुद्धा पंतप्रधानपदासाठी मध्ये येऊ शकत नाही. तसच शरद पवार हे राज्यातील आणि देशातील एक अनुभवी व्यक्तीमत्व आहेत. मागे मोदीही म्हणाले होते की शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात अनेक गोष्टी करत असतो. देशची प्रश्न कसे सोडवायचे याचा अभायास आहे. देशासाठी एक चागलं नेतृत्व आहे असं निश्चित मला वाटतं, अस अंबादास दानवे शरद पवार यांच्याविषयी म्हणाले.
Read also
- श्रीकांत शिंदेंवर सोपवणार मोठी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंचं पद जाणार
- “माझ्या जिल्हा प्रमुखांविरोधात निवडून दाखवा”; शहाजी बापुंना शिवसेनेचे ओपन चॅलेंज
- “एकनाथ खडसेंचं वय झालं आहे म्हणून आम्ही त्यांना दुर्लक्ष करतोय”; खडसेंविरोधात मोठा गौप्यस्फोट
- “एकेकाळी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार, असं म्हणणारा खासदार शिंदे गटात”
- “शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर