मुंबई : तब्बल दोन वर्षापासून यंदा मोठ्य़ा उत्सावात गणपती उत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकिय निवासस्थानी गणपती मुर्तीची स्थापना केली. अशातच पुण्यात आज गणेशोत्सावामुळे गर्दी असल्याने शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गर्दीत अडकल्याने त्यांनी मोटारसायकलवरून प्रवास केला. त्यांनी यांसर्दभात ट्विट पण केलं आहे.
“एकेकाळी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार, असं म्हणणारा खासदार शिंदे गटात”
कोविडच्या दोन वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या गणरायाचे अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे. आज गणरायाच्या स्वागतासाठी समस्त पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. याच दरम्यान ठीकठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी असल्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने प्रवास केला. असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पुण्यातील गणेशोत्सव आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची खरी ओळख आहे. त्यांनी पुण्याती प्रसिद्ध भाऊ रंगारी गणपतीच्या रथाचे सारथ्य केले आणि मिरवणुकीत देखील सहभाग घेतला.
“शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर
गणपतीच्या चरणी माझी प्रर्थना राहील की, मोतोश्रीच्या अंगणात सुद्धा सुख, शांती, आनंद भरभरून द्यावा, असं साकडं घालत. आमच्या रश्मी वहिनी आनंदित राहव्यात, अशी प्रार्थना देखील गणरायाला करतो, असं बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले. आमच्या भागात पाऊस झालेला नाही, गणपतीकडे प्रार्थना करतो की या भागात दोन दिवसात चांगला पाऊस द्यावा, अशीही प्रार्थना शहाजी पाटील यांनी गणरायाकडे केली आहे.
Read also
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
- “55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार, त्यामुळे दसरा मेळावा आम्हीच घेणार”; शंभुराज देसाई
- श्रीकांत शिंदेंवर सोपवणार मोठी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंचं पद जाणार
- “माझ्या जिल्हा प्रमुखांविरोधात निवडून दाखवा”; शहाजी बापुंना शिवसेनेचे ओपन चॅलेंज
- “एकनाथ खडसेंचं वय झालं आहे म्हणून आम्ही त्यांना दुर्लक्ष करतोय”; खडसेंविरोधात मोठा गौप्यस्फोट