अमरावती : सर्वत्र आज आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय बंगल्यावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर या शासकीय बंगल्यावर मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन केलं आहे. यासोबतच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आलं आहे.
“मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
कोविडनंतर दोन वर्षानंतर आज गणरायाचा उत्सव जोरात झालेला आहे. यावेळी नवनीत राणा यांनी गणरायासाठी मोदक देखील बनवले. जास्त एक्सपर्ट नाही मात्र जे सासुकडून 10, 12 वर्षात पाहुुन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणरायाला आवडणारा पदार्थ हा मोदक आहे. चॉकलेट, पानचे, खव्याचे मोदक मुलं बनवतात व बाप्पाला चढवतात. मोदक स्वत:च्या हाताने गणरायासाठी बनवण्यात वेगळाच आनंद आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
“55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार, त्यामुळे दसरा मेळावा आम्हीच घेणार”; शंभुराज देसाई
मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, यावर्षी गणपती उत्सव जोरात, नवरात्र जोरात. मी गणरायाला एकच मागणं करेन की, शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले पाहिजेत, बेरोजगार मुलांना रोजगार भेटला पाहिजे. या पद्धतीने आमचा देश आणि महाराष्ट्र चालला पाहिजे.
श्रीकांत शिंदेंवर सोपवणार मोठी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंचं पद जाणार
मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर गणरायाचे आगमन झालेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर देखील गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत झालेलं आहे. सागर आणि वर्षा बंगल्यावरचा गणपती या महाराष्ट्रावरचे संकट दुर करेल. अडीच वर्षानंतर गणपती महाराष्ट्राला पावेल, अशी प्रार्थना आमदार रवी राणा यांनी गणरायाला केली आहे.
Read also
- “येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा”; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- “उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
- अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
- अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास