मुंबई : मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर शिवसेनेना शिंदे गटातील आमदारांवर गद्दार म्हणुन टिकी करत आहे. शिवसेना आणि शिंदे गटात चांगलाच राजकीय वाद काही महिन्यापासुन सुरू आहे. यातच शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ल्या समजला जाणाऱ्या वरळी मतदार संघात शिंदे गटाकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. ठाकरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
“मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
आदित्य ठाकरे हे वरळी या मतदार संघातुन निवडुन आले आहेत. वरळी हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. मात्र ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात आता एकनाथ शिंदे यांनी आपलं राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आल्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ युवासेनेवर ही हक्क सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यावर भेट घेत. शिवसेनेची संघटना आम्ही बांधली. युवासेनेच्या बाबत लोकांना आवडणारा, युवकांमध्ये रमणारा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांची युवासेना प्रमुखपदी निवड करावी, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. युवासेना प्रमुख पद हे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. मात्र शिवसेनेसोबत आता युवासेनेवरही हक्क सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
Read also
- “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
- “ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला
- “शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं
- “येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा”; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- “उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका