मुंबई : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची सुरूवात आजपासून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार मेळघाट दौऱ्यावर आहेत. यावेळी अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्याच्या घरी जेवण देखील केलं. सत्तार यांच्या या दौऱ्याची राज्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. ते दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सत्तारांच्या या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टिका केली आहे.
“बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार
गावात जाऊन झोपणार आहेत. रात्री एक वाजता शेतात जाणार आहेत. दुसऱ्या दिवशी भाकर खाऊऩ एक कार्यक्रम करणार आहेत. काल ज्या ठाकाणी ते मुक्कामी होते तेथुुन हाकेच्या अंतरावर एका 25 वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे त्याच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. ज्या ठिकाणी ते दौरा करत आहेत त्या ठिकाणी रोज एका शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
कृषी मंत्री सत्तार उद्या अकोल्याला येणार आहेत. आमची त्यांना एकच विनंती आहे. एकदा शरद पवार यांची भेट घ्या. त्यांचा सल्ला घ्या. या दौऱ्य़ाला काहीही अर्थ नाही. तुम्ही केती दिवसात किती किलोमीटर याला अर्थ नसतो. ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तुमच्या सिंहासनाला कधी सुरंग लागेल हे तुम्हालाही कळणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिला आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
शेतकरी संकटात असेल तर त्या ठिकाणी जाणं, सांत्वन करणं हे कृषी मंत्र्याचं कर्तव्य असतं. उपकार केल्यासारखी गोष्ट नसते. किती प्रवास केला त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी मिळालं याला महत्व असतं. शेतकऱ्यांच्या मालाला भाव, त्याचं झालेलं नुकसान आणि ओला दुष्काळाची मागणी शेतकऱ्याची आहे, असं मिटकरी म्हणाले.
Read also
- “राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
- “शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
- रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड
- “भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
- शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ