मुंबई : मुंबईमधील मुंबादेवीच्या परिसरात मनसे पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या मनसेच्या कार्यकर्त्याचे नाव विनोद अरगिलें असल्याचं समजत आहे. मनसे प्रमुुख राज ठाकरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतील व त्याच्यावर योग्य कारवाई करतील, अशी आशा किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील असं सर्वांनाच वाटत आहे. अशा प्रकारची कृती करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षातुन हकालपट्टी करायला हवी. असं ज्यावेळी घडत असतं त्यावेळी ते इतरांनाही प्रोस्ताहान देणारं असतं. त्या फक्त महिलाच नाहीत तर त्या ज्येष्ठ महिला आहेत. ज्या पद्धतीने त्यांना ढकलण्यातं आलं अणि त्या पडल्या आहेत. कोणालाही ही कृती आवडणार नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्याची पक्षातुन हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे आणि कार्यकर्ते खांब रोवत होते. एक खांब पीडीत महिला प्रकाश देवी यांच्या मेडीकल समोर येत होता. त्याला महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांने महिलेच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे. यामुळे मनसे कर्याकर्त्यांच्या दादागिरीवरही लोकांनी आक्षेप घेण्यास सुरूवात केली आहे.
“ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला
पीडित महिलेने अरगिळे यांनी मरहाण केल्याचे सांगितले. तर त्यांच्या साथीदाराने शिवीगाळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला आहे. मेडिकल समोर खांब रोवण्यावरून हा वाद झाला असल्याचं सागंत. वादाचे रूपांतर मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.
Read also
- “शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
- रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड
- “भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
- शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
- “बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार