पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल चिंतामणी राजाचे दर्शन घेतले. यावेळी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला सुख आणि आनंद मिळतो असंही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आपल्याकडे दोन वर्ष गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरे झाले नाहीत. पण डॉक्टरांच्या रूपाने गणपती बाप्पाच आले होते असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी शिंदे सरकारवर खोचक टोला देखील लगावला.
“भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
दोन वर्ष कोविड असला तरी बाप्पा सर्वांच्या मनामध्ये विराजमान होते. त्यामुळे सण साजरा करता आला नसला तरी मनातून, आपापल्या परीने, घरी त्यांचं स्वागत केलं. दोन वर्ष अडचणींची होती. पण डॉक्टर आणि यंत्रणा, संपुर्ण प्रशासनाच्या मदतीने आपण कोविडवर मात करू शकलो. दोन वर्ष कदाचित डॉक्टाराच्या रूपाने बाप्पा आपल्याकडे आले होते. असं म्हणत शिंदे फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि इडीचं सरकार असल्याचा खोचक टोला लगावला.
शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
सध्यातील सरकारमधील लोक कार्यक्रम सोडतील तर जनतेची सेवा करतील ना. हे ऐवढे सेलिब्रेशन करण्यात येवढे मग्न आहेत की, बस्ता बांधला. त्यानंतर लग्न केलं. मात्र लग्नाचा अजूनही हनिमुन सुरू आहे. तसेच 50 खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके असंही त्यांनी म्हटलं. त्यावर आता भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ते देखील पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार
दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून गणपतीचं आगमन मोठ्या उत्साहात काल झालं. अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठपणा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईत गणपती उत्साहासाठी येत आहेत.
Read also
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला
- “तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी
- “राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
- “शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
- रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड