मुंबई : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाल्याचीही माहिती मिळत आहे. या पुर्वी अशोक चव्हाण काँग्रेसमधुन बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
“शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी अशोक चव्हाण गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष कुलकर्णी ही उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अशोक चव्हाण यांनी आमच्यात कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही, असं स्पष्टिकरण दिलं आहे.
“मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील काही आमदार आणि माजी मंंत्रीही भाजपच्या संपर्कांत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक चव्हणा यांच्या सोबत काँग्रेसमधील 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगितले जात होतं. त्यामुळे आता शिवसेनेनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसणार आहे.
“तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी
सोबतच, शिंदे सरकारतच्या बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच् चार ते पाच आमदार उशिराने सभागृहात पोहोचले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही अदृश्य हात आमच्या पाठी असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. फडणवीस यांचं हे विधान आणि चव्हाण यांची भेट यांचा संबंध लावला जात आहे.
Read also
- “शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध
- “प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल
- “आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”
- ”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
- “मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा