सोलापुर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांना मी सांगोल्यात दोन बंगले घेऊन देईन, अशी टिप्पणी शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती. याला शिवसेनेचे नेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
शहाजी बापूकडे बायकोला लुगडं घ्यायला पैसे नाहीत. एवढचं नव्हे तर हातभट्टी दारू प्यायल्यानंतर शहाजी पाटील त्याचं पैसेही दुसऱ्याला भरायला लावतात. ते शहाजी पाटील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घर काय बांधून देणार, असा खोचक सवाल शरद कोळी यांनी शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांना केला आहे.
“राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला
शहाजी पाटील संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमकं तेच कळत नाही, अशी घणाघाती टिका करत आमदार होण्यासाठी शहाजी बापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते. याचा त्यांना विसर पडलेला दिसत आहे. शहाजी पाटलांनी वायफळ बडबड बंद करावी. अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.
काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान
सोबतच, शिवसेनेनं सांगेल्यात लक्ष घालत आहे असं विचारलं असता शहाजी बापू पाटील यांनी मला पाडणार का? पडायची प्रॅक्टिस महाराष्ट्रात माझ्याएवढी कुणाची आहे? मी सात ते आठवेळा धडाधडा पडलो आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगेल्यात येऊन लोकांची कामं करवीत. त्यासाठी मी दोघांना बंगले भाड्याने घेऊन देतो, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलं होतं.
Read also
- “ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले, ते सध्या बेडकासारख्या उड्या मारताय”; रामदास कदम
- “ज्यांच्याकडे सत्ता असते, ते हव्या त्या गोष्टी करतात”; अजित पवार
- “राज ठाकरेंचा आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला “; शिवसेनेची राज ठाकरेंवर टिका
- “शिवसेनाप्रमुख म्हणून नाही पण प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार “; सदा सरवणकर
- “दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा