मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. मात्र यावर्षीचा दसरा मेळावा काहीसा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे गट शिवसेनेवर दावा करीत आहेत. यामुळे यंदाचा दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे भाषण करतील असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. परंतु त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी देखील दसरा मेळावा आम्हीच घेणार असल्याचं ठणकावून सांगत आहेत.
“प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल
यंदाचा दसरा मेळावा 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळाव्या घेण्यासाठी शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेत अर्ज केला आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनी देखील अर्ज सादर केला आहे. मात्र अद्यापही कोणालाही महानगरपालिकेने परवानगी दिली नाही. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिका कुणाला परवानगी दिली जाईल, याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
“आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”
शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर म्हणाले की, मी कुठल्याही गटातटाचा नाही. शिवसेनाचा आमदार असून गत पंधरावर्षापासून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज करीत असतो. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक एकनाथ शिंदे असतील. शिवसेना म्हणूनच अर्ज केला आहे. याचे संपुर्ण मार्गदर्शन एकनाथ शिंदे करणार आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार दसरा मेळाव्यातून जाणे ही महत्वाची गोष्ट आहे. शिवसेनाप्रमुख म्हणून नाही पण प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री शिंदे मार्गदर्शन कऱणार आहेत.
”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
दरम्यान, मागच्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेद घेऊन दसरा मेळावा हा शिवसेनाच घेणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यासाठी आमची जोरदार तयारी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र यावर शिंदे गटाकडून देखील दसरा मेळावा एकनाथ शिदेंच घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथील मैदान कुणाच्या ताब्यात जाणार त्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
- “राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला
- काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान
- “शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध