मुंबई : राज्यभरातून शिवसैनिक हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. मात्र यावर्षीचा दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने उभा ठोकला आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
“ज्यांच्याकडे सत्ता असते, ते हव्या त्या गोष्टी करतात”; अजित पवार
मेळावे घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण असे वाद टाळले पाहिजे. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. समोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. पवारांचा हा सल्ला मुख्यमंत्री मानतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“राज ठाकरेंचा आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला “; शिवसेनेची राज ठाकरेंवर टिका
सोबतच, शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनचे प्रमुुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभा होत होत्या. बाळासाहेबांनी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितले होते की, ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील. मात्र गेल्या काही काळात ज्या काही राजकीय घटना घडल्या आहेत, त्या सर्वांनी पाहिल्या आहेत. ज्यांच्याकडे सत्ता असते ते हव्या त्या गोष्टी करतात. दसरा मेळाव्यावरून वाद घालुन चालणार नाही. पहिल्यांदा एका पक्षाची सभा होऊल आणि नंतर दुसऱ्या पक्षाची सभा होईल. सर्वसामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतर सर्वांना समजेल. निवडणुका झाल्यानंतर कळेल की खरी शिवसेना कोणाची, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
Read also
- “ज्याच्याकडे पाहून बाप्पालाही हसू येईल, तो केवढा मोठा जोकर असेल”; सोमय्यांवर काॅंग्रेसचा प्रहार
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
- “भाजपचे राज्यातील अध्यक्षही अनभिज्ञ, त्यांना माहित झाल्यावर..;”रोहित पवारांचा खोचक टोला
- “शहाजी बापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही”
- “ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले, ते सध्या बेडकासारख्या उड्या मारताय”; रामदास कदम