मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते शांत होते. परंतु पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते. यावरून आता काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“राज ठाकरेंचा आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला “; शिवसेनेची राज ठाकरेंवर टिका
नोएडातील भ्रष्टाचाराचे ट्विन टॉवर पाडण्यात आले. महाराष्ट्रातील अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराचे स्मारक असलेला त्यांचा रिसॉर्ट पाडण्याची शक्ती बाप्पाने द्यावी अशी प्रार्थना केली. मुंबई महानगरपालिकेतील माफिया सरकार जावे यासाठीही बाप्पाकडे प्रार्थना केली आणि बाप्पाही माझ्याकडे बघून हसले, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली. त्यावर ज्याच्याकडे पाहून बाप्पालाही हसू येईल तो केवढा मोठा जोकर असेल असा टोला सचिन सावंत यांनी सोमय्यांना लगावला.
“दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा
किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्या मालकीचा रिसॉर्ट तोडकामासाठी कंत्राटदाराची नेमणुक करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. गणेशत्सोवादरम्यान कंत्राटदार नेमण्यात येणार असून दिवाळीपर्यत अनिल परबांचा रिसॉर्ट तुटणार असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
Read also
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
- “भाजपचे राज्यातील अध्यक्षही अनभिज्ञ, त्यांना माहित झाल्यावर..;”रोहित पवारांचा खोचक टोला
- “शहाजी बापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही”
- “ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले, ते सध्या बेडकासारख्या उड्या मारताय”; रामदास कदम
- “ज्यांच्याकडे सत्ता असते, ते हव्या त्या गोष्टी करतात”; अजित पवार