पुणे : केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी काल पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतुक कोंडी, चांदणी चौक परिसरातील वाहतुक समस्या, महानगपालिका, रोप वे, स्काय बस याविषयी विविध घोषणा केल्या. यावरून यातील काहीही होणार नाही. या केवळ घोषणाच राहणार. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असं म्हणत अखिल भारतीय हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी नितीन गडकरी यांच्यावर टिका केली आहे.
“भाजपचे राज्यातील अध्यक्षही अनभिज्ञ, त्यांना माहित झाल्यावर..;”रोहित पवारांचा खोचक टोला
पुण्याच्या दोन महानगरपालिका होणार नाहीत, पुण्यात स्काय बस होणार नाही, पर्वतीचा रोप वे देखील होणार नाही. उडती बस नंतर, पण आधी पुणेकरांना वेळेवर पीएमपी द्या, व्यवस्थित पाणी द्या, चांगले रस्ते द्या. ही सगळी खोटी आश्वासनं आहेत. एवढ्या वर्षात दुसऱ्या महानगपालिकेसाठी नाही अभ्यास केला. या केवळ घोषणाच राहणार आहेत, असा टोला आनंद दवे यांनी गडकरी यांना लगावला आहे.
“शहाजी बापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही”
मागच्या 5 वर्षात रोपवेचे डिझाइन, त्याचे बजेट झाले का तयार? असा सवाल करत. आंबिल ओढ्याची भिंत नाही बांधता आली 5 वर्षात आणि रोप वे बांधणार, बसेस उडवणार. केवळ निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते, अशी टिका आनंद दवे यांनी नितीन गडकरी यांची उडवली आहे.
“ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले, ते सध्या बेडकासारख्या उड्या मारताय”; रामदास कदम
सोबतच, पुण्यात वाहतुककोंडीची मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पुण्यात उडत्या बसेसची योजना पुण्यात आणली, तर वाहतुकीची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असं केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजनाही राबविण्याचा विचार गडकरींनी बोलून दाखवला आहे. याची आता विरोधक खिल्ली उडवत आहेत.
Read also
- “त्रिकोण, चौक दाखवा जिथे माझ्या आईबापाचं नाव दिले, बापाची प्रॉपर्टी आहे का?”
- “राजकारण हा माझा धंदा नाही, तर हे माझं व्रत आहे”; खासदार गिरीश बापट
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सबुरीचा सल्ला
- “ज्याच्याकडे पाहून बाप्पालाही हसू येईल, तो केवढा मोठा जोकर असेल”; सोमय्यांवर काॅंग्रेसचा प्रहार
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट