मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार स्वागत केलं. अमित शहा आज लालबाग राजाचं दर्शन घेणार आहेत. त्यांनतर ते मुंबई शहराचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर ते भाजपच्या काही नेत्यांची बैठक देखील घेणार आहे. त्याआधी त्यांनी एक मराठीमध्ये ट्विट केलं आहे.
“5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशात्सवात सहभागी होईन. तसेच शिक्षक दिनानिमित्ता दुपारी पवईत नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन करणार असल्याचं म्हटलं आहे.
“त्रिकोण, चौक दाखवा जिथे माझ्या आईबापाचं नाव दिले, बापाची प्रॉपर्टी आहे का?”
अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी जाणार होते. मात्र त्यांनी हा कार्यक्रम अचानकपण रद्द केला. त्यामुळे ते वर्षा येथील शासकीय निवासस्थानीच थांबणार आहेत. त्यांनतर राजकीय वर्तुळात यानंतर उलटसुलट चर्चा रंगू लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
“राजकारण हा माझा धंदा नाही, तर हे माझं व्रत आहे”; खासदार गिरीश बापट
दरम्यान, अमित शहा मुंबईतील राजकीय स्थितीचा आज आढावा घेणार आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची यावेळी रणनीती देखील ठरविली जाणार आहे. तसेच मुंबई महापालिकेची निवडणुक मनसेसोबत लढणार का ? यावर देखील आज शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपचे सर्व नेते मुंबईत दाखल झाले आहेत.
गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे.
आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन.
शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल.
— Amit Shah (@AmitShah) September 5, 2022
Read also
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
- एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
- “तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड
- बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
- “52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार