बुलढाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळा शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. या पार्श्वभूमीवर तुमची विचार धारा काँग्रेस आणि सेनेची आहे. तुम्ही ती संभाळत बसा. हिंदूत्वाची भुमिका आम्ही संभाळणार आहे. त्यामुळे आमच्या नावाचे उल्लेख तुमच्या कार्यक्रमात नको, असा इशारा शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सबुरीचा सल्ला
कोणी आपली बाजु खरी सांगत नाही. त्यांनी या आधीच्या मेळाव्यात त्यांनी काय भाषा वापरली हे तुम्ही पाहिलं आहं. शेगाव, चिखली या ठिकाणीही त्यांनी अशीच भाषा वापरली आहे. या ठिकाणीही त्यांनी जे बोलले ते मी ऐकलं आहे. त्यांनी जर चांगलं बोललं असतं तर आम्ही तिकडे गेलो नसतो. आमचं अजुनही आव्हान आहे की तुम्ही तुमचा पक्ष चालवा आम्ही तुम्हाला आडवं येत नाही, असही गायकवाड म्हणाले.
“ज्याच्याकडे पाहून बाप्पालाही हसू येईल, तो केवढा मोठा जोकर असेल”; सोमय्यांवर काॅंग्रेसचा प्रहार
सोबतच, बुलढाणा हा बिहार नाही. शिवसेनेच्या कार्यक्रमात हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी सभागृहात येऊ दिले, त्यामुळे पेलिसांची भूमिका संशयास्पद आहे. बुलढाण्याचे ठाणेदार कोणत्या आमदाराच्या शिफारशीवर येथे आले आहेत, याची आम्हाला कल्पना आहे, असा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
असे कितीही हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही. शिवसेनेचे काम करतच राहू. अम्ही पोलिस प्रशासनाची वाट पाहणार आहोत. हल्ले करणाऱ्यांची नावेही पालिसांना देण्यात येणाऱ्या अहवालात देणार आहोत. पोलिसांनीही योग्य कार्यवाही न केल्यास संपुर्ण जिल्ह्यात याचा उद्रेक उमटेल, असा इशारा शिवसेना प्रमुख बुधवंत यांनी दिला आहे.
Read also
- बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
- “52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
- “5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
- “त्रिकोण, चौक दाखवा जिथे माझ्या आईबापाचं नाव दिले, बापाची प्रॉपर्टी आहे का?”
- “राजकारण हा माझा धंदा नाही, तर हे माझं व्रत आहे”; खासदार गिरीश बापट