बुलढाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळा शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
“ज्याच्याकडे पाहून बाप्पालाही हसू येईल, तो केवढा मोठा जोकर असेल”; सोमय्यांवर काॅंग्रेसचा प्रहार
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला. आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते हे शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरू असताना त्या कार्यक्रमात घुसल्याचं सांगितलं जात आहे. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, असा दावा करत गायकवाड यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी शब्दाला शब्द वाढत गेला आणि पोलिसांसमोर दोन्ही गट भिडले. अखेर पोलिसांनी राडा शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
“भाजपचे राज्यातील अध्यक्षही अनभिज्ञ, त्यांना माहित झाल्यावर..;”रोहित पवारांचा खोचक टोला
यामध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांंना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे तगडा पोलिस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की हल्ला करण्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते.
Read also
- “52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
- “5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
- “त्रिकोण, चौक दाखवा जिथे माझ्या आईबापाचं नाव दिले, बापाची प्रॉपर्टी आहे का?”
- “राजकारण हा माझा धंदा नाही, तर हे माझं व्रत आहे”; खासदार गिरीश बापट
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सबुरीचा सल्ला