मुंबई : भारताचा जीडीपी 3.5 ट्रिलियन डॉलर वर गेल्यामुळे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं जात आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंग्लंड आणि भारताची तुलना करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावर भाजपनेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, इंग्लडचा जीडीपी 3.2 ट्रिलियन डॉलर आहे. तोच भारताचा 3.5 ट्रिलियन झाला म्हणून नगारे पिटणाऱ्यांनो. त्यांना फक्त 6.8 कोटी लोकांचं कल्याण करायचंय. आपल्याला 140 कोटी लोकाचं. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो. असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
जितेंद्र आव्हाड यांच्या टिकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच टोला लगावला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री झालेत. 3.5 ट्रिलियनचा टप्पा गाठून आपण इंग्लंडला मागे सारले ही त्यांच्या दृष्टीने अचिव्हमेंट नाही. पण मग हे 70 वर्षात काॅग्रेसला का झेपले नाही. ? असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हे शक्य कसे झाले? असा देखील सवाल त्यांनी केला.
“52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
दरम्यान, अलिकडेच भारताने आपल्या जीडीपीमध्ये 3.5 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलंडला आहे. त्यामुळे जगातील सर्वात पाचव्या क्रमांकावरील अर्थव्यवस्थामध्ये भारताचा नंबर लागला आहे. यावरून देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं जात आहे. तर विरोधक त्यांच्यावर टिकास्त्र सोडत आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलचं गाजत आहे.
Read also
- “मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल
- “तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
- एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?