मुंबई : मराठी माणसाला आपापसात लढवलं जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते, अशी टिका सामनातुन करण्यात आली होती. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आठवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय ? नाचता येईना अंगण वाकडे! स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार शिवसेनेला प्रतुत्तर दिलं आहे.
बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले… तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले..? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे… आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई कि विरार कि आणखी त्याच्यापण पुढे?, असा सवाल आशीष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
“52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता… पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ. अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले ? फोडा झोडा सोडा, तुमचे तर ‘मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा’ हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय? मराठी माणसात फूट, ही आरोळी 100% झुट, असही आशिष शेलार म्हणाले.
“5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
सोबतच, शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश निती अवलंबली जात आहे. मराठी माणुस आपसात लढवसा जात आहे. कमळाबाई हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे धडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच! असं समनात म्हणले आहे.
Read also
- “तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
- एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
- “तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड