मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाहांनी भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांची मेघदूत बंगल्यावर बैठक घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी पाठीत सुरा खुुपसला, आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत.
एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
उद्धव ठाकरे यांनी पाठीत सुरा खुुपसला, जनमताचा अपमान केला. राजकारणात कधीच धोका सहन करू नका. उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवण्याची वेळ आली आहे. कानाखाली मारली तर ती शरीराला लागते मात्र आपल्या घरासमोर कानाखाली मारली, तर तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जातो. आज ती वेळ आली आहे, असं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड
काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भाजपाने विस्तार करत आहे. 2 सीटसाठी शिवसेनेनं 2014 मध्ये युती तोडली होती. तसेच शिवसेना स्वत:च्या निर्णयांमुळेच छोटी झाली. पुढचा महापौर हा भाजपचाच हवा आहे. तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवले आहे. मात्र मी 150 नगरसेवककांचे टार्गेट ठेवले आहे, असही अमित शहा म्हणाले.
बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि ती आपल्याबरोबर आहे. खयाली पुलावमुळे शिवसेनेची आता ही अवस्था झाली आहे. आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केला नाही, असंही अमित शहा म्हणाले. भाजप पदाधिकारी आणि नेत्यासोबतच्या बैठकीत शहांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
Read also
- “पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”
- “मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल
- “तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा