मुंबई : तुम्ही बीएमसी साठी 135 चे टार्गेट ठेवले आहे. मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट ठेवा. आता उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवण्याची वेळ आली आहे. असं म्हणत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मिशन मुंबई महानगरपालिकेवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांची मेघदूत येथे भाजपच्या कार्यकर्त्यासोबत बैठक पार पडली त्यावेेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
“मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
उद्धव ठाकरे यांनी पाठीत सुरा खुपसला, जनमताचा अपमान केला. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भाजपने विस्तार केला आहे. तसेच भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करू नका, जे धोका देतात, त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे, तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले, तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असा आरोप देखील अमित शहा यांनी शिवसेनेवर केला आहे.
“..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी अमित शहा यांचा उल्लेख चाणक्य म्हणून पुन्हा केला. ते म्हणाले की, मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असे माना अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य- मुंबई महानगरपालिका. संपुर्ण देशाला चाणक्य कोण आहेत ? हे माहित आहे आणि चाणक्य म्हणजे अमित शाह आहेत. असंही ते म्हणाले.
एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
दरम्यान, मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. मागील निवडणुकीत जे निसटलं ते यंदा गमवायचं नाही. मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अडकली आहे. आता मुंबईकारांसाठीच आपल्याला इतिहास रचायचा आहे. आपण सर्व एका नव्या इतिहासाचे साक्षीदार होणार असून 2017 ला राहिलेलं स्वप्न 2022् ला पूर्ण करायचे आहे. असंही देखील ते म्हणाले.
Read also
- “तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
- “उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल
- “पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”
- “मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल
- “तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल