मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपालांना पाठवलेली विधान परिषदेच्या सदस्यांची यादी राज्यापालांनी रद्द केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारने पुन्हा या 12 सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. त्यावरून आता काॅंग्रेससह , राष्ट्रवादीने देखील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल
महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपालांनी रद्द केली आहे. गेली 1 वर्ष राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारची यादी प्रलंबित ठेऊन घटनेची पायमल्ली केली. आता इडी सरकारकडून या 12 आमदारांसाठी नवीन यादी पाठवण्यात येईल व ती राज्यपाल तात्काळ मान्यही करतील असा टोला काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर लगावला आहे.
“पार्टटाईम, इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री”
याप्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज्यापालांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, मविआ सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीची यादी राज्यपाल महोदयांनी पावणेदोन वर्ष प्रलंबित ठेऊन शेवटी ती मान्य केली नाहीच पण सरकार बदलताच पावणेदोन महिन्याच्या आत ती रद्द केली. कदाचित सध्याच्या सरकारकडून नवीन यादी पाठवली जाईल आणि ती मान्यही केली जाईल. पण यानिमित्ताने संविधानाला अभिप्रेत असलेला कारभार आज राज्यपाल महोदयांकडून होत नसल्याचं चित्र निर्माण झाल आणि सामान्य नागरिकांकडूनही हिच भावना बोलून दाखवली जात आहे. असंही रोहित पवार म्हणाले.
“मराठी पोरांना वडापाव विकायला कोणी लावले..?”सामनाच्या टिकेला भाजपचा सवाल
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील अलिकडील राजकीय संघर्ष सगळ्यांनी पाहिला आहे. यातच आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांवर नवीन यादीवर शिक्कामोर्तेब करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या 12 जागांसाठी बाराशे नावं आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे पुुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
मविआ सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी महामहिम राज्यपालांनी रद्द केली आहे. गेली 1 वर्ष राज्यपालांनी मविआ सरकारची यादी प्रलंबित ठेऊन घटनेची पायमल्ली केली. आता ईडी सरकारकडून या 12 आमदारांसाठी नवीन यादी पाठवण्यात येईल व ती राज्यपाल तात्काळ मान्यही करतील. pic.twitter.com/VJ7JCSRifG
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 5, 2022
Read also
- “तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
- “शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
- “दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
- “आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
- “तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह